Friday 23 February 2018

दत्तक कायदयात शिथिलता आणावी : पंकजा मुंडे


नवी दिल्ली, २३ :  राज्यात मुल-मुली दत्तक घेणा-यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र, नियम अधिक कडक असल्यामुळे दत्तक घेण्यास अधिक वेळ लागत असल्यामुळे दत्तक घेणा-या पालकांना बराच काळ वाट पाहावी लागते, त्यामुळे या नियमात शिथिलता आणावी, अशी मागणी माहिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याकडे आज  केली.
येथील शास्त्री भवनात  केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री यांच्या कक्षात श्रीमती मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण सचिव राकेश श्रीवास्तव आणि राज्याच्या महिला व बाल विकासाच्या सचिव विनिता वेद  यावेळी उपस्थित होत्या. बैठकीनंतर श्रीमती पंकजा मुंडे यांनी माहिती दिली.
            दत्तक देण्यासंदर्भातील कायद्यांमध्ये अधिक गती देण्यासंदर्भातील केंद्रीय मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी केलेल्या सूचनांवर राज्यशासन लवकरात लवकर कार्यवाही करेल, असे  श्रीमती मुंडे यांनी सांगितले. राज्यातील काही भागात कुपोषणाचे प्रमाण आहे, कुपोषित  बालकांना पोषण आहार देऊन हे प्रमाण कमी करण्याचे कार्य राज्य शासन करीत असल्याचे श्रीमती मुंडे यांनी श्रीमती गांधी यांना सांगितले.  
अनाथांना आरक्षण देण्याचे कौतुक
राज्य सरकाराने अनाथांना आरक्षण देण्याचा निणर्य नुकताच घेतलेला आहे.  यासंदर्भातील सविस्तर माहिती  माहिती  श्रीमती पंकजा मुंडे यांनी  श्रीमती मनेका गांधींनी यांना दिली. या निणर्याचे कौतुक श्रीमती गांधी यांनी यावेळी केले. यासह राज्यात राबविण्यात येणा-या मातृत्व वंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओं बेटी पढाओं योजनांची माहिती श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिली. मुलींसाठी सुरू झालेल्या अस्मिता योजनेची माहितीही दिली असल्याचे श्रीमती मुंडेनी सांगितले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     00000

सूचना – सोबत छायाचित्रे जोडली आहेत.           

No comments:

Post a Comment