विकिपीडियाच्या जागतिक वारसा छायाचित्र स्पर्धेत
मिळाला बहुमान
नवी दिल्ली, २३ : विकिपीडियाने आयोजित
केलेल्या विकी लव्हस् मोनुमेंटस या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत प्रशांत खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे
छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे.
विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांची
छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी
छायाचित्र स्पर्धा होती.
१० हजार छायाचित्रकारांचा सहभाग
या स्पर्धेसाठी जगभरातून २ लाख ४५ हजार
छायाचित्रे प्राप्त झाली होती, तर जगातल्या १० हजार छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. आग्रा
ते इटली पर्यंत अनेक वारसा स्थळांची २ लाखांहून अधिक छायाचित्रे या स्पर्धेसाठी
पाठविण्यात आली, यापैकी विकिपीडियाने ४८९ छायाचित्रे
पुरस्कारासाठी पात्र ठरविली व अंतीमतः यातून १५ छायाचित्रे पुरस्कारासाठी
निवडण्यात आली.
खंडोबाच्या भंडारा यात्रेच्या छायाचित्रात
हळदीचा सुगंध
विकिपीडियाने
जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या भंडारा यात्रेचे छायाचित्र जगातील सर्वोत्तम
छायाचित्र म्हणून निवड केल्यानंतर या छायाचित्राचे वर्णनही अप्रतिम केले आहे. इतिहास, रंग व भक्तिभाव याचा अपूर्व संगम या छायाचित्रात
पाहायला मिळतो व यातून हळदीचा (भंडारा) सुगंध अनुभवता येतो, असे
विकिपीडियाने नमूद केले आहे.
जगातील इटली, बांग्लादेश, थायलंड,जर्मनी,इराण,इजिप्त,कॅनडा,ऑस्ट्रेलिया,जॉर्जिया या
देशातील छायाचित्रांनीही
पहिल्या १५ पुरस्कारात स्थान पटकाविले आहे.
छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांच्या विषयी
प्रशांत सोमनाथ खरोटे हे मूळचे नाशिकचे असून उत्तम छायाचित्रांसाठी त्यांना आतापर्यंत विविध
३६ पुरस्कार मिळाले आहेत. यातील महत्वाचे
पुरस्कार
१)आंतरराष्टीय
फोटो। हंटर ,पत्रकारीता या विषयात सुवर्ण आणि रजत पदक.
२)महाराष्ट
शासनाचा तोलाराम कुकरेजा पुरस्कर.
३)लोकमत
अचिव्हमेंट पुरस्कार.
४)वसुंधरा
(पुणे) पुरस्कार.
५)
सामाजिक वणीकरण, सलग
तीन वर्ष पुरस्कार.
६)
महाराष्ट्र शाशन ( पर्यटन विभाग, १,२ विजेता ).
७)सिंहस्त
कुंभमेळा
सिंहस्त
क्लिक, कुंभ दर्पण या संस्थेचे
राज्यस्तरीय स्पधेत प्रथम, द्वितीय पुरस्कार.
00000
No comments:
Post a Comment