जेर्मी लालरीनुंगा व
तृप्ती माने ला सुवर्ण पदक
नवी दिल्ली,
६ : खेलो इंडिया शालेय
क्रीडा स्पर्धेच्या ७ व्या दिवशी आज भारोत्तोलनात
महाराष्ट्राच्या जेर्मी लालरीनुंगा व तृप्ती माने यांनी सुवर्णपदक पटकाविली. यासह
मुल व मुलींच्या भारोत्तोलनात महाराष्ट्राने २ रजत व ३ कास्यपदकाची कमाई करून
महाराष्ट्राला पदक तालीकेत आघाडी मिळवून दिली आज दुपार पर्यंत राज्याला एकूण ५९
पदक मिळाली आहेत.
मुलांच्या भारोत्तोलनात तीनही पदक महाराष्ट्राला
या
स्पर्धेत आज मुला-मुलींचे भारोत्तोलनाचे
सामने झाले. मुलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात तीनही पदक महाराष्ट्राने
पटकाविली. यात, पुणे येथील लष्कर क्रीडा संस्थेच्या जेर्मी लालरीनुंगा याने २५१
गुण मिळवून सुवर्ण पदकावर नाव कोरले. पुणे येथील सीबीएससी बीएससी एशिया शाळेचा
जेकब वानलालत्लुंगा याने २४७ गुण मिळवून राज्याला रजत पदक मिळवून दिले तर
कोल्हापूर जिल्हयातील कुरुंदवाड येथील सानेगुरूजी विद्यालयाच्या अभिषेक निपाणे
याने २२२ गुण मिळवून कास्य पदक पटकाविले.
इचलकरंजीच्या
तृप्ती माने ला सुवर्ण पदक
मुलींच्या ५८ किलो वजनी गटातील भारोत्तोलनातही
महाराष्ट्राची चमकदार कामगिरी राहीली. इचलकरंजी येथील व्यंकटराव माध्यमिक शाळा व
कनिष्ठ महाविद्यालयाच्या तृप्ती माने हीने १७२ गुणांसह सुवर्ण पटक पटकाविले. मनमाड
येथील छत्रे न्यु इंग्लीश स्कुलच्या पुजा परदेशी हीने १४७ गुण मिळवूण कास्य पदकाची
कमाई केली. पश्चिम बंगालच्या सुकर्णा अडक
हीने १६८ गुणांसह रजत पदक पटकाविले.
मुलींच्या
५३ किलो वजनी गटातील भारोत्तोलनातही महाराष्ट्राने रजत व कास्य पदक पटकाविली. कोल्हापूर
जिल्हयातील कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनया पाटील हीने
१४९ गुण मिळवून रजत पदक पटकाविले. नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाच्या धनश्री
पवार ने १४७ गुणांसह कास्य पटकावर नाव कोरले. मनिपूरची लामबाम १५९ गुणांसह सुवर्ण
पदकाची मानकरी ठरली.
महाराष्ट्र
व दिल्ली दुस-या क्रमांकावर
या स्पर्धेत ६ व्या दिवशी दुपार पर्यंत महाराष्ट्राने १८
सुवर्ण मिळवून पदतालीकेत दुस-या क्रमांकावर असलेल्या दिल्ली सोबत बरोबरी साधली
आहे. याशिवाय १८ रजत आणि २३ कास्य पदकांसह महाराष्ट्राने एकूण ५९ पदक पटकाविली आहे.
हरियाणा २० सुवर्णांसह प्रथम क्रमांकावर असून या राज्याने एकूण ५४ पदकांची कमाई
केली आहे. १८ सुवर्णांसह एकूण ६२ गुण मिळवून यजमान दिल्ली दुस-या क्रमांकावर आहे.
००००००
No comments:
Post a Comment