खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची ५० पदकांची कमाई
नवी दिल्ली,
५ : खेलो इंडिया शालेय
क्रीडा स्पर्धेच्या ५ व्या दिवशी आज महाराष्ट्राच्या अवंतिका नराळे ने सुवर्ण पदक
पटकाविले. यासह दोन रजत व दोन कास्य पदकाची कमाई करत
महाराष्ट्राने आतापर्यंत एकूण ५० पदक मिळवीली आहेत.
या स्पर्धेत आज महाराष्ट्राला धावण्याच्या शर्यतीत १ सुवर्ण
, भारोत्तोलनात २ तर व्हॉलीबॉल आणि कुस्तीत प्रत्येकी एक कास्य पदक मिळाले आहे.
१०० मिटर
धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या अवंतिका नराळे हीने सुवर्ण पदक पटकाविले.
तामीळनाडूच्या आर गिरीधाराणी आणि एम.
सांत्रा तेरेसा यांनी रजत व कास्य पदक पटकाविले.
भारोत्तोलनात मुलींच्या ४४ किलो वजनी गटात मनमाड येथील छत्रे न्यु इंग्लीश
स्कुलच्या खुशाली गांगुर्डे हीने रजत पदक पटकाविले. या गटात मनीपुरच्या कोनसाम
देवीने सुवर्ण तर आंध्रप्रदेशच्या बी ज्योथी हीने रजत पदकावर नाव कोरले.
भारोत्तोलनात ४८ किलो वजनी गटात इचलकरंजी येथील व्यंकटराव
हायस्कुलच्या प्रतिक्षा साठे ने कास्य पदक पटकाविले. पश्चिम बंगालच्या
श्रबानीदास हीने सुवर्ण पदकाची तर ओडिशाच्या स्नेहा सोरेन ने
रजत पदकाची कमाई केली.
मुलींच्या कुस्ती मध्ये ६५ किलो
वजनी गटात महाराष्ट्राच्या विश्रांती पाटील हीने पंजाबच्या सुखप्रित कौरचा
पराभव करून कास्य पदक पटकाविले.
मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र ठरला उपविजेता
मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठणा-या महाराष्ट्राच्या संघाला
पश्चिम बंगाल सोबत कडवी झुंज द्यावी लागली. पश्चिम बंगालने हा सामना ३ -० असा जिंकला महाराष्ट्राला रजत पदक मिळाले आहे.
गुजरातने उत्तरप्रेदशचा पराभव करून कास्य पदक पटकाविले.
या स्पर्धेत ५ व्या दिवसा अखेर महाराष्ट्राने १६ सुवर्ण, १५
रजत आणि १९ कास्य पदकांसह एकूण ५० पदक पटकावून पदक तालीकेत तिसरा क्रमांक मिळविला
आहे. २० सुवर्णांसह एकूण ५४ पदक मिळवून हरियाणा पहिल्या क्रमांकावर तर १८ सुवर्णांसह एकूण ६१
पदक मिळवून दिल्ली दुस-या स्थानावर आहे.
००००००
No comments:
Post a Comment