नवी दिल्ली 28 : मातृभाषा समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे, मत प्रसिद्ध
लेखक वसंत लिमये यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केले.
मराठी
भाषा गौरव दिनानिमित्ताने महाराष्ट्र
परिचय केंद्रात आज दुस-या दिवशी लॉक ग्रीफींग, विश्वस्त, धुंद- स्वच्छंद आणि कॅम्प
फायर या पुस्तकांचे लेखक वसंत लिमये यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. लिमये यांचे तुळशी वृंदावन
देऊन स्वागत केले. यावेळी अनुवादिका हेमांगी नानीवडेकर यांनी श्री लिमये यांची प्रकट मुलाखत घेतली.
मातृभाषा
समृद्ध करण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची असून तसे प्रयत्न प्रामाणिकपणे
होणे गरजेच आहे. आधुनिकता व तंत्रज्ञानामुळे वेगाने बदल होत आहे, काही जुने शब्द
लुप्त होत आहेत तर काही नव्या शब्दांची भरही पडत असल्याचे श्री लिमये म्हणाले.
प्रगट मुलाखत घेतांना श्रीमती
नानीवडेकर यांनी श्री लिमये यांना बोलत करत त्यांचा लेखक बनण्याचा प्रवास उलगडला. दै. महानगरमध्ये लेखांच्या रूपात लिहीलेले सह्याद्री भटकंतीचे
अनुभव पुढे ‘धुंद- स्वच्छंद’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालेला प्रवास रोचक
असल्याचे सांगितले.
‘लॉक ग्रीफींग’ या पुस्तकांसाठी परदेशी वा-या, प्रत्येक गोष्टीचे केलेले बारीक निरिक्षणे,
कथानक सत्य आणि कल्पनेच्या आटयापाटयावर रंगत जावे आणि वाचकांला लय मिळण्यासाठी घेतलेली
मेहनत, याविषयी श्री लिमये यांनी यावेळी सांगितले.
‘विश्वस्त’ ही
कादंबरी वाचताना वाचकाला लेखकाने केलेला नवीन प्रयोग असल्याचे जाणवते.
यामध्ये इतिहास आणि भुगोलाची सांगड
घातलेली आहे. वाचकाला कादंबरी वाचताना चित्तथरारकते सोबतच रसरसशीत पणा असायला हवा
यासाठी 17 मजली इमारतबांधीत असताना प्रत्येक मजल्यासाठी केलेली वेगवेगळी रचना
लक्षात घेतल्यावर जसे बांधकाम केले जाते. तशीच ही कादंबरी लिहीलेली असल्याचे श्री
लिमये यांनी मुलाखतीत व्यक्त केले.
‘विश्वस्त’ कांदबरी
यावरचे सादरीकरण दाखविण्यात आले. आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांची त्यावरील
प्रतिक्रियेचेही सादरीकरण यावेळी सादर केले गेले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन माहिती
अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले.
आजच्या कार्यक्रमास दिल्लीकर मराठी
वाचक मंडळी, पत्रकार, कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 27 व 28 फेब्रुवारी या दोन्ही दिवस
आयोजित प्रगट मुलाखतीचे फेसबुकवर थेट प्रेक्षपण करण्यात आले.
No comments:
Post a Comment