नवी दिल्ली, ०१ : देशात होळी व रंगपंचमीची लगबग
सुरु असताना आज अधिकारी- कर्मचारी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र
परिचय केंद्रात होळी साजरी केली.
परिचय केंद्रात आज होळी निमित्त होळी
मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक
सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी, न्युज-१८ लोकमतचे दिल्ली प्रतिनिधी सागर
वैद्य आणि परिचय केंद्राचे कर्मचारी सहभागी झाले .
यावेळी उपस्थित प्रत्येकाने आपल्या
भागातील होळी विषयी माहिती दिली. याकाळात गावा-गावांमध्ये घडून येणारा एकोपा,
साजरे होणारे विविध स्तुत्य उपक्रम, प्रत्येक भागातील वैविद्यपूर्ण परंपरा आदींची
माहिती दिली. कविता व गितांचे सादरीकरणही झाले. यावेळी उपस्थितांनी एकमेकांस हर्बल
व कोरडे रंग लावून पर्यावरणपूरक होळी साजरी केली .
No comments:
Post a Comment