२४ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर
मुल व मुलींच्या खा-खो संघाना सुवर्ण पदक
नवी दिल्ली, ७ : खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या ८ व्या दिवशी महाराष्ट्राच्या मुल व मुलींच्या संघाने सुवर्ण पदक पटकावली. तसेच, अंचिता शेऊली, मानेश गाढवे आणि पूर्वा किर्वे यांनी सुवर्ण पदक पटकविले. २४ सुवर्णांसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.आतापर्यंत महाराष्ट्राला एकूण ८४ पदक मिळाली असून स्पर्धेत हे सर्वाधिक पदक आहेत .
या स्पर्धेत आज मुलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत ७७ किलो वजनी गटात महाराष्ट्राने सुवर्ण व रजत पदक पटकावली. पुणे येथील बॉईज स्पोर्ट एएसआयच्या अंचिता शेऊली याने २९२ गुण मिळवून सुवर्ण तर कुरुंदवाड येथील एस.के.पाटील महाविद्यालयाच्या प्रितम चव्हाण ने २३१ गुण मिळवत रजत पदक पटकवले.
भारोत्तोलनाच्या ९४ किलो वजनी गटात महाराष्ट्राला रजत पदक मिळाले. कल्याण येथील के.एम.अग्रवाल महाविद्यालयाचा तेजस लोखंडे याने २३१ गुण मिळवत रजत पदकाची कमाई केली.
मुलांच्या खो-खो च्या सामन्यात महाराष्ट्र आणि केरळमध्ये चुरशीचा सामना झाला. या रंगतदार सामन्यात महाराष्ट्राने केळचा ११-१० असा पराभव करून सुवर्ण पदकावर नाव कोरले. कर्नाटक संघाने कास्य पदक पटकवले.
खो-खो च्या सामन्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राने बाजी मारत सुवर्ण पदकाची कमाई केली. महाराष्ट्राने हा सामना ७-६ असा जिंकला. कर्नाटकाने दिल्लीचा परभाव करून कास्य पदक पटकविले.
मुलींच्या ६९ किलो वजनी गटातील भारोत्तोलनात महाराष्ट्राने कास्य पदक पटकाविले. इचलकरंजी येथील व्यंकटराव माध्यमिक शाळेच्या श्रेया मनमुखी हीने कास्य पदकाची कमाई केली.
जिम्नॅस्टीक मध्येही महाराष्ट्राला २ सुवर्ण
जिम्नॅस्टीक मध्ये आज महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली यात महाराष्ट्राला २ सुवर्ण, १ रजत व ४ कास्य पदक मिळाली. ठाणे येथील डीएव्ही पब्लीक स्कुलची पुर्वा किर्वे हीने अनइव बार्स आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक प्रकारात ८.७० गुणांसह सुवर्ण पदक मिळविले तसेच पुर्वा ने फ्लोर आर्टिस्टी जिम्नॅस्टीक प्रकारात कास्य पदकही पटकविले. पोमेल जिम्नॅस्टीक प्रकारात मुंबई डोबिंवली येथील विद्यामंदीर शाळेचा मनेश गाढवे याने ११ गुण मिळवून सुवर्ण पदक पटकविले. औरंगाबाद येथील शारदा मंदिर च्या सिध्दी हटेकर हीने अनइव बार्स आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक प्रकारात ८.४० गुणांसह रजत पदक मिळविले
जिम्नॅस्टीकमध्ये इंडीव्हीज्वल ऑल राऊंड रिदमीक प्रकारात ठाणे येथील हिरानंदानी फाऊंडेशन स्कुलच्या प्रियंका आचार्य हीने ३९.२५ गुणांसह कास्य पदक पटकविले. क्रिडा प्रबोधनी महाळुंगे पुणे येथील एश्वर्या बेलदार हीने टेबल वाल्ट आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक प्रकारात कांस्य पदक पटकावले. मुंबई येथील डी.जी.रूपारेल महाविद्यालयाच्या आदित्य फडणीस याने रिंग्स जिम्नॅस्टीक प्रकारात कास्य पदक मिळवले.
मुंबई दादर येथील डी.पी.वाय.ए. हायस्कुलच्या फ्रिया जिजीना हीने मुलींच्या ज्युडो क्रीडा प्रकारात ६३ किलो वजनी गटात रजत पदक पटकवले. तर औरंगाबाद येथील आझाज महाविद्यालयाचा शेख महंमद फरजान याने मुलांच्या ज्युडो क्रीडा प्रकारात ८१ किलो जवनी गटात तर मुलांच्या ७३ किलो वजनी गटात अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या आदित्य धोपावकर याने कांस्य पदक पटकवले.
या स्पर्धेत ८ व्या दिवशी महाराष्ट्राने २४ सुवर्ण मिळवून पदतालीकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. याशिवाय २६ रजत आणि ३४ कास्य पदकांसह महाराष्ट्राने एकूण ८४ पदक पटकाविली आहे. हरियाणा २३ सुवर्णांसह दुस-या क्रमांकावर असून या राज्याने एकूण ६० पदकांची कमाई केली आहे. २२ सुवर्णांसह एकूण ७७ गुण मिळवून यजमान दिल्ली तिस-या क्रमांकावर आहे.
No comments:
Post a Comment