Thursday, 15 February 2018

शिवजयंती सोहळयासाठी राष्ट्रपती प्रमुख पाहुणे



नवी दिल्ली, १५ : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली  येथे आयोजित होणा-या शिवजयंती सोहळयाच्या मुख्यकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत,अशी माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली .
        राजधानीत 1920 फेब्रुवारी 2018 दरम्यान वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असून  राष्ट्रपती या सोहळयाच्या मुख्यकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या पटांगणावर सायंकाळी 6 वाजता होणा-या या कार्यक्रमास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमीरल सुनील लांबा, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नु आणि करविर अधिपती शाहु छत्रपती महाराज यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार असल्याचे  खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले.
           या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत "शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे.
                              असे असणार शिवजयंती सोहळयाचे स्वरूप 
19 फेब्रुवारी
सकाळी 9 : 00 - संसदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण.
सकाळी 10 : 10 -
 नवीन महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम 
                         (पाचशे महिलांचा महाराष्ट्रीय वेशभूषेत सहभाग).

सकाळी11 : 00 ते दुपारी 1 -
 महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, राजपथ ते इंदिरा गांधी राष्ट्रीय
कला केंद्रापर्यंत शोभायात्रा

दुपारी
 1 : 00 ते सायंकाळी 6 - इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे शिवकालीन युद्धकलेची 
प्रात्यक्षिके, महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्र व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन,  डॉक्‍युमेंट्रीचे सादरीकरण, रक्तदान शिबिर, पुस्तक प्रकाशन.
सायंकाळी 6 : 00 - मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीस अभिवादन. 
7 : 00 - शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारीत "शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग
 
                                    20
 फेब्रुवारी
सायंकाळी 7 : 00 - "शिवगर्जना' महानाट्य प्रयोगाचे पुन्हा सादरीकरण

       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा  :  http://twitter.com/micnewdelhi
 

                                                     ०००००००

No comments:

Post a Comment