Friday 23 March 2018

महाराष्ट्रातील 10 वस्ती स्तर संघाला राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार











हिंगोलीतील 3 आणि वसई-विरारमधील 2 वस्ती स्तर संघाचा समावेश
नवी दिल्ली, २३ : महाराष्ट्रातील 10 वस्ती स्तर संघाला आज राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये हिंगोलीतील 3 आणि वसई-विरारमधील 2 वस्ती स्तर संघाचा समावेश आहे.

            येथील  प्रवासी भारतीय केंद्रात आज केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने  दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन (NRULM) या अंतर्गत कार्यशाळेच आयोजन करण्यात आले. यावेळी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय शहरी व नागरी राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली. यावेळभ्‍ सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील नगरपरिषद संचालनालयाचे संचालक डॉ. विरेंद्र कुमार सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रत्येक क्षेत्रातील सिटी मिशन व्यवस्थापन युनिटमधील सदस्यही उपस्थित होते.

            दिनदयाल अंत्योदय योजन राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन अंतर्गत नगरपरिषदेच्या हद्दीतील स्वच्छता राखण्यासाठी वस्ती स्तर संघ नेमण्यात आलेले आहेत. यांना वस्ती संघांना कचरा गोळा करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, हगणदारी मुक्त परिसर करण्यासाठी प्रचार प्रसार करणे, वैयक्तीक तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे, सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, त्याठीकाणी वृक्ष लागवड करणे, गांडुळ खत निर्मिती करणे अशी कामे सोपविण्यात आली होती, जाणीव जागृती मोहिम राबविणे, आरोग्य विषयी जागरूकता मोहीम राबविणे, अशी कामे सोपविण्यात आली होती. यामध्ये ज्यांनी सर्वच मापदंड पुर्ण केली अशा वस्ती स्तर संघांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
             यावेळी  देशभरातील उत्कृष्ट कार्य करणा-या वस्ती स्तर संघाला केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्री यांच्याहस्ते पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 10 वस्ती स्तर संघाचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील  हिंगोलीतील संभाजी वस्ती स्तर संघ, निरंजनबाबा वस्ती स्तर संघ, राजमाता जिजाऊ वस्ती स्तर संघ, भद्रावतीमधील उन्नती वस्ती स्तर संघ, वसई-विरार येथील मदीना वस्ती स्तर संघ, आधार वस्ती स्तर संघ अकोल्यातील राणी लक्ष्मीबाई वस्ती स्तर संघ, उदगीरमधील  विकास वस्ती स्तर संघ, मालेगावमधील मानसी वस्ती स्तर संघ, वर्धा येथील समता वस्ती स्तर संघ यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment