Tuesday, 13 March 2018

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्यामहाराष्ट्र परिचय केंद्राला भेट विद्यार्थ्यांची












नवी दिल्ली, 13 : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.  
   
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या या २३ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचे सहायक प्राध्यापक अनिल देशमुख यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

        यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.

            महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.                        
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याविषयीचे सादरीकरण उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर शिवाजी विद्यापीठाच्या  जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचा विद्यार्थी स्मितील पाटील  याने आभार मानले.   

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                         000000                                        


No comments:

Post a Comment