नवी
दिल्ली, १६ : केंद्रीय
रसायने व खते मंत्रालयाने देशभर २ हजार ४४ आदर्श किरकोळ खत विक्री केंद्र उभारले
असून महाराष्ट्रात १६४ केंद्र उभारण्यात
आली आहेत.
केंद्रीय
रसायने व खते राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. दर्जेदार
खत व शेतीची अवजारे पुरविण्यासाठी मंत्रालयाकडून तीन वर्षात २ हजार आदर्श किरकोळ
खत विक्री केंद्र उभारण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले होते. त्यानुसार, देशभरातील २३
राज्यांमध्ये २ हजार ४४ केंद्र उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रात १६४ केंद्र
उभारण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त ३६६ केंद्र उभारण्यात आली आहेत
तर आंध्रप्रेदशात २९९ केंद्र उभारण्यात आली. गुजरात मध्ये २१४ तर तेलंगना मध्ये
२१२ केंद्र उभारण्यात आली आहेत.
काय आहे आदर्श किरकोळ खत विक्री केंद्र
दर्जेदार
खत व शेतीची अवाजारे पुरविण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये घोषणा
करण्यात आल्यानुसार देशात तीन वर्षाच्या कालावधीत २ हजार आदर्श किरकोळ खत विक्री
केंद्र उभारण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून
शेतक-यांना मूळ किंमतीत गुणवत्तापूर्ण खते विक्री केली जाते. याशिवाय मृदा व
बियाणे चाचणी, पिकांना समतोल प्रमाणात पौष्टिक पदार्थ पुरविणे आदिंबाबतचे
मार्गदर्शन करण्यात येते. तसेच, ट्रक्टर, रोटाव्हेटर, पिक कापणी यंत्र, मळणी
यंत्र, फवारणी यंत्र आदि शेतक-यांना
भाडयाने देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
000000
No comments:
Post a Comment