नवी
दिल्ली दि 2- युनेस्को व विकिपीडियाने जागतिक महिला
दिनानिमित्त डिजिटल युगातील लिंगभेद दूर करण्यासाठी ‘विकी फॉर वुमेन’ हा अभिनव
उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमासाठी युनेस्कोने ऑनलाईन
नोंदणीही सुरू केली आहे.
जगाचा
ज्ञानकोश असलेल्या विकिपीडिया मध्ये दररोज २५ हजाराहून अधिक लेख सामाविष्ट होत
असतात,परंतु यापैकी १७ टक्के चरित्रात्मक माहिती ही महिलांविषयी असते. डिजिटल
प्लॅटफॉर्म वरील ही लिंगभेद तफावत दूर करण्यासाठी युनेस्को व विकिपीडियाने ‘विकी फॉर वुमेन’ ही अभिनव चळवळ हाती घेतली आहे.
आपण देऊ शकतो
असे योगदान.....
डिजिटल
युगातील लिंगभेद तफावत दूर करण्यासाठी प्रत्येकजण योगदान देऊ शकतो. यासाठी
विकिपीडिया या संकेतस्थळावर आपण आपले अकाउंट तयार करावयाचे आहे आणि कोणत्याही
भाषेत,
किंवा शक्य असेल तर एकापेक्षा अधिक भाषेत कर्तृत्ववान महिलांच्या
कार्याची माहिती अपलोड करावयाची आहे. विशेषतः शिक्षण, विज्ञान,
संस्कृती, सामाजिक व मानवी शास्त्र, जनसंवाद व माहिती क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांविषयी माहिती
विकिपीडियामध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन युनेस्कोने केले आहे.
युनेस्को
मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन
८
मार्च या जागतिक महिला दिनी पॅरिस येथिल युनेस्को मुख्यालयात डिजिटल
प्लॅटफॉर्मवरील लिंगभेद तफावत दूर करण्यासाठी युनेस्कोचे अधिकारी, सदस्य, सहयोगी सदस्य,विद्यार्थी
व नागरिक असे १५० जण या दिवशी कर्तृत्वान महिलांविषयी माहिती तसेच त्यांचे
चरित्रात्मक लेखन विकिपीडियावर अपलोड करणार आहेत.
विकिपीडियावरील
भाषानिहाय स्थिती
सद्यस्थितीत
विकिपीडियावर सर्वाधिक माहिती ही इंग्रजी भाषेत आहे, सद्यस्थितीत ५५ लाखाहून अधिक लेख हे
विकिपीडियावर इंग्रजी भाषेत आहेत. चिनी भाषेत सुमारे १० लाख लेख, फ्रेंच भाषेत २० लाख, डच भाषेत २१ लाखाहून अधिक तर
*मराठी भाषेत ५० हजार* लेख अपलोड झाले आहेत. यापैकी केवळ १७ टक्के लेख हे महिलांविषयी विकिपीडियावर उपलब्ध आहेत.
युनेस्को संकेत
स्थळावर नोंदणी करा
युनेस्को
व विकिपीडियाच्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी खालील लिंक क्लीक करा.
00000
सूचना : सोबत
छायाचित्र जोडली आहेत.
No comments:
Post a Comment