Thursday, 1 March 2018

बिपीन मल्लिक सांस्कृतिक मंत्रालयाचे अतिरीक्त सचिव


        



नवी दिल्ली,  ०१ :  भारतीय प्रशासकीय सेवेच्या (1986) महाराष्ट्र तुकडीचे प्रशासकीय अधिकारी  व महाराष्ट्रसदनाचे माजी निवासी आयुक्त बिपीन मल्लिक यांची आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अतिरीक्त सचिव व अर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
            केंद्र शासनाच्या कॅबिनेट समितीने आज बिपीन मल्लिक यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवेच्या अन्य अधिका-यांच्या  विविध मंत्रालयात नियुक्तीस मंजुरी दिली आहे. बिपीन मल्लीक हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिरीक्त सचिव म्हणून कार्यरत होते.
            मुळचे ओडीशाचे असलेले श्री मल्लिक यांनी सर्वप्रथम अहमदनगर जिल्हयाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. पुढील 10 वर्षाच्या काळात सिंधुदुर्ग व सातारा जिल्हा परिषदांचे मुख्यकार्यकारी अधिकारी, कोल्हापूर महापालीकेचे उपायुक्त, सोलापूर महापालिकेचे आयुक्त व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2011 मध्ये त्यांनी दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. यानंतर त्यांनी 2015 मध्ये ते केंद्रीय कामगार मंत्रालयात सहसचिव आणि 2016  मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरीक्त सचिव म्हणून पदभार सांभाळला आहे.    

No comments:

Post a Comment