नवी
दिल्ली, दि. २२ : प्रधानमंत्री
आवास योजना-ग्रामीण(पीएमएवाय-जी) अंतर्गत गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद आणि वाशिम जिल्हयांमध्ये १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे
बांधण्यात आली आहेत.
देशातील
जनतेला हक्काची घरे देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेची (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरुवात करण्यात
आली. यानुसार मार्च २०१९ पर्यंत देशात १ कोटी २ लाख घरे बांधण्याचे उदिष्टय
ठेवण्यात आले. आजपर्यंत ५१ लाख घरे बांधून झाली असून उर्वरित घरे नियत वेळेत
बांधण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पीएमएवाय-जी योजनेंतर्गत देशातील ११५ महत्वाकांक्षी
जिल्हयांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील चार जिल्हयांचा यात समावेश आहे.
यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या जिल्हयांचा समावेश आहे. या जिल्हयांतील
ग्रामीण भागात १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे बांधण्यात आली आहेत.
नंदूरबार
जिल्हयात सर्वात जास्त २३८७ घरे
खान्देश
विभागातील महत्वाचा व आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असणा-या नंदूरबार जिल्हयात
सर्वात जास्त २ हजार ३८७ घरे बांधण्यात आली आहेत. जिल्हयात ६ तालुक्के असून अक्कलकुवा
तालुक्यात ७०, धडगाव ४२, नंदूरबार ६९५, नवापूर ५३४, शहादा ७८० आणि तळोदा तालुक्यात
आतापर्यंत २६६ घरे बांधण्यात आली आहेत.
वाशिम जिल्हयातील ६ तालुक्यांमध्ये
गेल्या १४ महिन्यात १ हजार २५४ घरे
बांधण्यात आली आहेत. कारंजा तालुक्यात ४२९, मालेगाव ३४५, मंगरूळपीर १६२, मानोरा ११९,
रिसोड ५६ आणि वाशिम तालुक्यात १४३ घरे बांधण्यात आली आहेत.
गडचिरोली या नक्षल प्रभावित व आदिवासी
बहुल जिल्हयातील १२ तालुक्यांमध्ये ९६५
घरे बांधण्यात आली आहेत. अहेरी तालुक्यात २०, आरमोरी २०८, भामरागड ७, चामोर्शी ९१,
वडसा ११३, धानोरा ६०, एटापल्ली २, गडचिरोली ११३, कोरची १२३, कुरखेडा २०९, मुलचेरा ४
आणि सिरोंचा तालुक्यात १५ घरे बांधण्यात आली आहेत.
दुष्काळ प्रवण उस्मानाबाद
जिल्हयातील ८ तालुक्यांमध्ये ७६४ घरे बांधण्यात आली. भूम तालुक्यात ९९, कळंब ६९,
लोहारा ६५, उमरगा ९४, उस्मानाबाद १७५, परांडा ८६, तुळजापूर १३९ आणि वाशी तालुक्यात ३७ घरे बांधण्यात आली आहेत.
00000000
No comments:
Post a Comment