Tuesday 20 March 2018

नवमाध्यमांच्या उपयोगातुन नेतृत्व विकास : उपसंचालक












चाणक्य आंतरराष्ट्रीय नेतृत्व विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांची परिचय केंद्राला भेट
नवी दिल्ली, २० : नवमाध्यमांच्या उपयोगातुन नेतृत्व विकास करता येऊ शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी चाणक्य आंतरराष्ट्रीय नेतृत्व विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांना परिचय केंद्राच्या भेटीच्या वेळी केले.
मुंबई येथील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणारे चाणक्य आंतरराष्ट्रीय नेतृत्व विकास संस्थेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी दिल्ली अभ्यास दौ-यावर असून  आज  महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी श्री कांबळे यांनी मार्गदर्शन केले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.
       आज आपण माध्यमांच्या युगात वावरत असून नेतृत्वविकासाठी सामाजिक माध्यमे मोठी भुमिका निभावू शकतात असे सांगत उपसंचालक म्हणाले, या माध्यमांचा सकारात्मक उपयोग होणे गरजेचे आहे. जनतेच्या हिताची माहिती देऊनही नेतृत्वविकास करता येऊ शकते, असेही श्री कांबळे यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी औपचारिक वार्तालाप झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
            महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.    

No comments:

Post a Comment