नवी
दिल्ली, 6 : बृहन्महाराष्ट्राशी
संवाद दृढ करण्यामध्ये ‘पुढचे पाऊल’ची महत्वपुर्ण भुमिका असल्याचा सूर ‘महाराष्ट्र आणि
बृहन्महाराष्ट्र मधला संवाद’ याविषयावरील
चर्चासत्रातून निघाला.
‘पुढचे पाऊल’ आणि ‘महाराष्ट्र
शासन’ यांच्या सयुंक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ‘महाराष्ट्र महोत्सव-जागर महाराष्ट्र दिनाचा’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज दुस-या दिवशीच्या प्रथम सत्रात
‘महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र मधला संवाद’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रात वरीष्ठ अधिकारी आनंद
पाटील, उन्मेष वाघ, डॉ. विजय पिंगळे, राजेश पाटील सहभागी झाले. या चर्चासत्राची अध्यक्षता आनंद पाटील यांनी
केली. बृहन्महाराष्ट्रशी संवाद दृढ करण्यात ‘पुढचे पाऊल’
ची महत्वपुर्ण भुमिका असल्याचे मनोगत प्रत्येकाने व्यक्त केले.
पुढचे पाऊल ची पार्श्वभुमी ही ‘षटकार’ पासून सुरू झाली असल्याचे आनंद
पाटील यांनी सांगितले. वर्ष 2007 साली,
महाराष्ट्रातुन दिल्लीत स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी
काही करावे यासाठी झालेल्या अनौपचारीक गप्पांमधुन ‘षटकार’ चा जन्म झाला. भारतीय प्रशासकीय सेवांच्या तयारीसाठी येणा-या
उमेदवारांसाठी ‘षटकार’ ने अभिमत मुलाखतींचे आयोजन केले. त्यानंतर हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने
स्वीकारला. ‘षटकार’ उपक्रमाचा पुढाकार भारतीय परदेशी सवेत असलेले ज्येष्ठ अधिकारी
ज्ञानेवश्वर मुळे यांनी सुरू केला. ‘पुढचे पाऊल’चे संस्थापक सदस्य आणि निमंत्रक म्हणुन ही श्री मुळे यांची भुमिका सर्वात
महत्वपुर्ण असल्याचे आनंद पाटील यांनी यावेळी
व्यक्त केले.
विविध कॅडरमध्ये असणारे मराठी अधिकारी वेगवेगळया राज्यात काम करीत
असतात. अशा वेळी आपल्या कामाच्या
माध्यमातुन मराठी व्यक्तींना मदत करने, मराठी संस्कृती जोपासणे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही होत असल्याचे
मत वक्त्यांनी यावेळी मांडले.
उन्मेष वाघ सध्या गुजरातमध्ये कार्यरत आहेत. गुजरातमधील
अहमदाबाद, बडोदा या शहरात मोठया प्रमाणात मराठी लोक राहतात. मात्र, त्यांचा
महाराष्ट्राशी काही संबंध उरलेला नाही. असे निरिक्षण त्यांनी व्यक्त केले. हा
संबंध पुर्नप्रस्तापीत करणे महत्वाचा आहे. याशिवाय देशभर जिथे मराठी लोक राहतात, मराठी
अधिकारी कार्यरत आहे अशा सर्वांना जोडण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी
यावेळ व्यक्त केले. मराठी माणुस नेटवर्क उभारण्यात कमी पडतो. मराठी व्यक्तींही नेटवर्क उभारण्याची कला अवगत
करायला शिकले पाहिजे. असे मत श्री वाघ
यांनी मांडले.
डॉ. विजय पिंगळे हे तामिळनाडु कॅडेर
असून सध्या केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात दिल्लीत आहेत. त्यांनी
तामिळनाडुमध्ये सांस्कृतिक कार्यक्रामांमध्ये अनेक मराठी नाटक बसविली आहेत.
महाराष्ट्रामध्ये दर्जेदार नाटकांची पंरपरा असल्याचे सांगुन ती कायम राहावी ती
वाढावी म्हणुन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा भुप्रदेश
हा पश्चिम भागात मोडत असल्यामुळे
महाराष्ट्रातील व्यक्ती दक्षिण भारतीयही
नाही आणि उत्तर भारतीयही नाही. मात्र, आपले एक वेगळे अस्तित्व नक्कीच
असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
इतर
राज्यात वावरतांना त्यांचे काही स्वीकारायला हवे तसेच आपले वेगळे मराठीपणही सदैव
टिकवून ठेवायला हवे. असे विचार त्यांनी व्यक्त केले.
ओडीसा कॅडेर मध्ये कार्यरत राजेश
पाटील म्हणाले, ओडीसामधल्या इतिहासात मराठी माणसांच्या खुणा ठिकठिकाणी दिसतात.
ओरीसा भाषेतील व्याकरण हे एका मराठी व्यक्तीने लिहीले असल्याची माहिती दिली. यासह येथील जगननाथ मंदिराला भोसले यांनी बराच
निधी दिल्याचे ही सांगितले. देशभरातील राज्यात चांगल्या सकारात्मक होणा-या विविध
विषयांची माहिती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासह ज्या राज्यात काम
करतो तीथल्या लोकांशी संस्कृतीशी एकरूप झाल्यामुळेच चांगल्या कामांचे परिणाम दिसतात.
आज ओडीसा विविध क्षेत्रात प्रगती करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजेश पाटील हे लेखकही आहेत. त्यांनी स्पर्धा
परीक्षाकाळातील स्वत:च्या संघर्षावरील पुस्तक लिहीली. त्या पुस्तकाचे
पाच भाषेत भाषांतर झाले असून ओरीया भाषेतील झालेल्या अनुवादामुळे आपण ओडीसात अधिक
प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment