नवी दिल्ली, 6 :
मराठी कविता ही आशय संपन्न असून तीने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. त्यामुळे मराठी
कवितेची दशा योग्य आहे मात्र, नव कवींना दिशा देण्याची गरज असल्याचे मत प्रसिध्द कवी व गायक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी आज महाराष्ट्र महोत्सवात व्यक्त केले.
येथील
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमीत्त ‘पुढचे पाऊल’ संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवाच्या दुस-या दिवशी ‘मराठी कवितेची दशा व
दिशा’ या विषयावर विचार मांडताना डॉ. जावडेकर बोलत होते.
कविता हे अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम
अूसन कविता ही त्या-त्या भाषेच्या भावविश्वाचा कळस असते. मराठी भाषेला कवितेची दिर्घ
परंपरा आहे. मराठी कवितांनी अनेक पिढया घडविल्या असे डॉ. जावडेकर म्हणाले. कविता ही अर्थकारण व समाजकारण आदीचे अदृयष्य
कंगोरे घेऊन वाचकांपुढे येते. ही दिर्घपरंपरा मराठी कवितांनी जपली आहे. युवा कवीही
सध्या मराठी भाषेत काव्य लिखान करीत आहेत.
मात्र, आजच्या पिढीतील कविंच्या कविता एकसुरी होत असल्याचे चित्र आहे. या कविंनी
समाजभान राखत रचना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेतील अभिजात कविता, रंगमंचीय
कविता, समजुतीच्या कविता, ॲटीटयूडच्या कविता आदी प्रकारांवर डॉ. जावडेकर यांनी
विश्लेषण केले. कवितेत छंदाचे महत्व पटवून
देताना त्यांनी प्रसिध्द कवी वसंत बापट रचित ‘मुंबईच्या मणकर्णीके नेसूनी फिके वसन
गहीना…’ ही लावणी सादर केली. तसेच , प्रसिध्द साहित्यीक पु.ल. देशपांडे व सुनिता
देशपांडे यांनी वाचन केलेल्या कविश्रेष्ठ बा.भ.बोरकर यांच्या ‘सरीवर सरी आल्या ग’
या कवितेतील सोंदर्यस्थळे उलगडून दाखविणारी
ध्वनी चित्रफीत सादर केली. डॉ. जावडेकर यांनी स्वरबध्द व संगीतबध्द
केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या ‘तूज मज नाही भेद केला सहज विनोद’ या अभंगाच्या
ध्वनीचित्रफित सादरी करणाने कार्यक्रमाची
सांगता झाली.
महाराष्ट्र
महोत्सवात रंगली काव्य मैफील
सकाळच्या सत्रात
दिल्लीतील कविंची महाराष्ट्र महोत्सवात काव्य मैफील रंगली. डॉ. ज्ञानेश्वर मुळे,
जीवन तळेगावकर, संदीप बोबडे, अश्विनी महाजन आणि डॉ. बाळकृष्ण मातापूरकर या कविंनी
यावेळी कविता सादर केल्या.
संदीप बोबडे
यांनी, नौकरी निमित्त महाराष्ट्र सोडून दिल्लीत आलेल्या मराठी माणसांच्या मनाची
घालमेल मांडणारी ‘पुढचे पाऊल’ ही अष्टाकारातील कविता सादर केली. जागतिकीकरणात
माणसांच्या भावविश्वाचा ठाव घेणारी ‘संध्याकाळ –उद्या’ ही वेगळया धाटणीची कविता सादर
करून जीवन तळेगावकर यांनी उपस्थितांच्या टाळया मिळविल्या. दिल्लीतील रस्त्यांवरील
ट्राफीकमध्ये अडकलेल्या माणसांची व्यथा मांडणा-या डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या
‘अजून मनाला कळले नाही कोण कुणाला देतो भुंगा…’ या कवितेने उपस्थितांना स्थिमीत
केले.
0000000000
No comments:
Post a Comment