Monday, 25 June 2018

रत्नागिरी येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार




नवी दिल्ली दि. २५ : रत्नागिरी येथील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक  कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या.

            रत्नागिरी  जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमीकल प्रकल्प  उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची           निर्मिती                     व विकास      करण्यासाठी  आज  सौदी  अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) चे  राज्यमंत्री तथा एडनॉक  समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर  यांनी  केंद्रीय  पेट्रोलियम व नैसर्गिक  वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि  युएई  चे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान  यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या .

                                                           अशी असणार भागीदारी
             इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)  या भारतातील  सार्वजनिक क्षेत्रातील  तेल कंपन्यांनी ५०:२५:२५  प्रमाणे भागिदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी  स्थापना  केली.  आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व  सौदी अरामको आणि एडनॉक  या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे.  
          
                                        पेट्रोकेमीकल  प्रकल्पाचे असे होणार फायदे

या प्रकल्पातून दिवसाला  १.२ दशलक्ष बॅरल  कच्च्या तेलावर (क्रूड ऑईल) प्रक्रिया करण्यात येईल. तसेच,  पेट्रोल , डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पदानेही या प्रकल्पातून करण्यात येणार आहेत. या सोबतच मोठ- मोठया प्रकल्पांसाठी कच्चा मालही  या प्रकल्पातून पुरविण्यात येणार आहे.

यापूर्वी ११ एप्रिल २०१८ रोजी १६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा  मंचाच्या मंत्रिस्तरीय शिखर संमेलनात सौदी अरामको ने भारतासोबत आरआरपीसीएल प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला असून आज एडनॉक  समुहाला सहगुंतवणूकदार केले आहे.            
                                                               000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २३७/ दिनांक २५.६.२०१८




No comments:

Post a Comment