नवी
दिल्ली दि. 25 : नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या 30 जूनला प्रथमत: 2000
शेळया-मेंढया आखाती देशाला निर्यात
होण्याची, माहिती आज खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील उद्योग भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन खासदार डॉ. विकास
महात्मे यांनी केले. यावेळी कृषी व प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ निर्यात विकास
प्राधिकरणाचे (अपेडा) महाव्यवस्थापक उपेन्द्र वत्स उपस्थित होते.
विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील
शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतक-यांच्या शेळया-मेंढयांचे निर्यात करण्याचे
पाऊल शासनाव्दारे उचलले जात आहे. पहिल्या टप्प्यात 30 जूनला 2000 जीवंत शेळया-मेंढया
आखाती देशात निर्यात केल्या जातील. निर्यात होणा-या शेळया-मेंढयांची वैद्यकीय तसेच
संबधित तपासणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या खेपेच्या शेळया-मेंढया निर्यात केल्या
जातील.
केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय,
मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना आखली गेली, असल्याचे श्री
महात्मे माहिती यांनी दिली. या नवीन उपक्रमाव्दारे मेंढपाळ, शेळी पालन करणा-या शेतक-यांना रोजगाराच्या तसेच आर्थिक
उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पशुधन हे शेतक-यांसाठी ‘एटीएम’ सारखे असते.
पशुधनापासून शेतक-यांना आर्थिक लाभ मिळतो.
भविष्यात शेळया-मेंढया निर्यातीसाठी तत्सम सहकारी संस्था
निर्माण करण्यात येण्याचा मानस असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment