Saturday 21 July 2018

13 कोटी वृक्ष लागवड मोहिमच्या समारोपीय कार्यक्रमाचे राष्ट्रपतींना निमंत्रण




नवी दिल्ली, 21 : महाराष्ट्रमध्ये वृक्ष लागवड ही मोठी चळवळ बनली आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत 1 ते 31 जुलै 2018 पर्यंत 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या वृक्ष लागवड मोहिमेचा समारोप करण्याचे निमंत्रण राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज दिले.
            राज्यात वर्ष  2016 मध्ये 2 कोटी, वर्ष 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय निश्चित केले होते. या मोहिमेला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वर्ष 2016 मध्ये 2.83 कोटी तर वर्ष 2017 मध्ये 5 कोटींच्यावर वृक्ष लागवड झाली आहे. यावर्षी आतार्पंयत 10 कोटी 85 लाख 99 हजार 122 वृक्ष लागवड झालेली आहे. महाराष्ट्राच्या या वृक्ष लागवड मोहिमेस राष्ट्रपती यांनीही सहभागी व्हावे, यासाठी आज वने मंत्री श्री मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन, त्यांना निमंत्रण दिले.

No comments:

Post a Comment