जीएसटी परिषदेत महाराष्ट्राची मागणी मान्य
नवी दिल्ली, 21 : सॅनिटरी नॅपकीनला जीएसटीतून काढावे ही महाराष्ट्राची मागणी आज जीएसटी परिषदेच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षते झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
येथील विज्ञान भवनात आज वस्तु व सेवा कर(जीएसटी) च्या 28 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सॅनिटरी नॅपकीनवरील कर पुर्णत: माफ व्हावा यासाठी महाराष्ट्राच्या सर्वच स्तरावरून मागणी होत होती, महाराष्ट्राच्या या मागणीवर आज जीएसटी परिषदेने निर्णय घेतला. यापुढे सॅनिटरी नॅपकीनवर कुठलाही कर लावण्यात येणार नाही असल्याची, प्रतिक्रीया श्री मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर दिली.
बांबूवरील कर 18 टक्क्यांवरून 12 टक्के वर आणण्यात आला
आजच्या जीएसटी बैठकीमध्ये आणखी एक महत्वाचा निणर्य घेण्यात आला, बांबूवरील कर 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणण्यात आला असल्याची, माहिती श्री मुनगंटीवार यांनी दिली. बांबूपासून तयार होणा-या फर्नीचर तसेच बांबूपासून केलल्या फ्लोरींगवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशात बांबूच्या क्षेत्रात महाराष्ट्र उत्तम काम करित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारले जात असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजुनिमसरकर /वृत्त वि. क्र.270/ दिनांक 21.०७.२०१८
No comments:
Post a Comment