नवी
दिल्ली, २४ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२
हजार ९३५ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण २ लाख ६७ हजार ५४६ घरे मंजूर करण्यात आली आहेत.
केंद्रीय
गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या आज
झालेल्या ३६ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध
शहरांतील गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर करण्यात आली आहेत. या बैठकीत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात,
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि उत्तराखंड या
राज्यांसाठी एकूण २ लाख ६७ हजार ५४६ घरे
मंजूर करण्यात आली आहेत.
0000
रितेश भुयार /वृत्त वि.
क्र. २७५/ दिनांक २४.७.२०१८
No comments:
Post a Comment