महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
नवी दिल्ली दि. 10 : ‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा
मुक्ती,
हैद्राबाद मुक्ती
आंदोलनात
मोलाचे
योगदान देणा-या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला.
क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो
आंदोलनाच्या 76 व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांचा
सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी
उपस्थित होते.
सन्मान
झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्हयातील कुपवडा
येथील श्री देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील श्री गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ. अवधूत डावरे आणि श्री वसंत अंबुरे,
मुंबईतील श्री गदाधर गाडगीळ आणि श्री अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील श्री बाळासाहेब जांभूळकर, श्री अरविंद मनोलकर, श्री
वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील श्री वसंतराव माने या स्वातंत्र्य
सैनिकांचा समावेश आहे.
स्वातंत्र्य
सैनिक देवाप्पा खोत हे सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील आहेत. सध्या 99 वर्षाचे
आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढयात श्री खोत यांनी कुपवाड सेंटर (चावडी ) येथे झालेल्या बॉम्ब
ब्लास्ट मध्ये त्यांनी भाग घेतला होता. कुपवाड येथेच जवळपास असणार माधवनगर येथे रेल्वे
लाईन त्यांनी उद्धवस्त केली होती. तसेच तत्कालीन धुळे कोषागार कार्यालयालाही हानी
पोहोचविली होती.
स्वातंत्र्य
सैनिक गणपतराव गभणे, नागपूर जिल्ह्यातील आहेत सध्या ते 80 वर्षाच्या जवळपास असून
आजही त्यांच्या आवाजात दम आहे. गोवा
मुक्ती आंदोलनात श्री गभणे यांनी सक्रीय भाग नोंदविला होता. 15 ऑगस्ट 1955 ला कॉमरेड
हेमंतकुमार बसू यांच्या नेतृत्वामध्ये डोडा मार्गे आईखेडा येथुन त्यांनी
गोव्याच्या जंगलात जाऊन सत्याग्रह केला. पोर्तुगीज पोलीसांनी त्यांना लक्ष्य बनवून
खूप मारहाण केली होती. हैद्राबाद मूक्ती आंदोलनातही श्री गभणे त्यांनी हीरहीरीने
भाग घेतला होता.
स्वातंत्र्य
सैनिक डॉ. अवधूतराव डावरे हे परभणी जिल्ह्याचे आहे. श्री डावरे यांनी 1938 ते 1948
पर्यंत झालेल्या विविध आंदोलनात भाग घेतलेला होता. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सत्याग्रहीयांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच परभणीमध्ये
झालेल्या या आंदोलनाचे नियोजन केले. तत्कालीन इंग्रजी शाळा, महाविद्यालयामध्ये जनजागृती
करून त्यांनी शाळा बंद पडल्या. विदेशी
वस्त्र आणि वस्तुंची होळी केली होती. झेंडा सत्याग्रहातही श्री डावरे यांनी सक्रीय
सहभाग घेतला होता. शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिला कोषागार कार्यालय,
पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा कारागृहात पोलीस स्टेशनवर तिरंगा ध्वज फडकविला
होता. त्यांनी 2 वर्ष सक्त मजूरीची शिक्षा उपभोगली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात
त्यांनी लोणी कॅम्पमध्ये रझाकारांशी मुकाबला केला होता.
स्वातंत्र्य
सैनिक वसंत अंबुरे हे परभणी जिल्ह्याचे आहेत. त्यांचे वडील चंद्रनाथ अंबुरे हे
सक्रीय स्वातंत्र्य सैनिक होते. 1947 मध्ये वसंत अंबुरे यांचे वडिल तुरूंगात परभणी आणि औरंगाबाद या तुरूंगात होते. त्यावेळी श्री वसंत अंबुरे भूमिगत राहून स्वातंत्र्य
संग्रामाचे कार्य पूर्ण केले. हैद्राबाद मुक्ती संग्रामातही श्री वसंत अंबुरे यांनी
सक्रीय सहभाग घेतला.
स्वातंत्र्य
सैनिक गदाधर गाडगीळ मुंबई येथे स्थायिक असून सध्या 88 वर्षांचे आहेत. श्री गाडगीळ हे आपल्या
काही मित्रांसोबत गोवा मुक्ती संग्राम मध्ये सहभागी झाले होते. 15 ऑगस्ट 1954 ला ‘पोर्तुगीज चलेजाव’ या ना-यांने सत्याग्रहाची सुरूवात केली. या संग्रामात गोळीबार झालेला होता. 19 सप्टेंबर
1954 मध्ये त्यांना कैदही झालेली होती. लष्कारासोबत ते 18 डिसेंबरला गोव्याला गेले होते
आणि 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्य
सैनिक वसंत प्रसादे, अरविंद मनोलकर आणि बाळासाहेब जांभुळकर या तिन्ही स्वातंत्र्य
सैनिकांनी दादरा-नगर हवेलीच्या संग्रामात 1954 वर्षी सक्रीय सहभाग नोंदवून लढा
यशस्वी केला. अपु-या शस्त्र व इतर साहित्यानिशी केवळ जिद्दीच्या भरश्यावर मातृभूमीला पोर्तुगींजाच्या तावडीतून सोडविले.
स्वातंत्र्य
सैनिक अनंत गुरव यांनी 1954 च्या दादरा नगर हवेलीच्या आंदोलनात भाग घेतला. फ्रान्सीस
मस्करान्स आणि तानाजी रावराणेजीच्या नेतृत्वात सत्याग्रही तुकडी सोबत दादरा नगर
हवेली मध्ये शिरले. यामध्ये पोलीसांव्दारे
झालेल्या गोळीबारात श्री गुरवजींना उजव्या हातावर गोळी लागली होती. 3 जानेवारी
1955 ला गुरव यांनी होडीतून तानाजी रावराणेजी यांच्या सोबत गोव्याच्या हद्दीत
प्रवेश केला आणि राष्ट्रध्वज फडकविला. ऑगस्ट 1955 च्या पहिल्या आठवडयात बांदा-पत्रादेवी येथे झालेल्या सत्याग्रहात सामील झाले होते. या
सत्याग्रहात श्रीमती सहोदरा रॉय या जख्मी महिलेला वाचविताना श्री गुरव यांना पायावर गोळी लागली. श्री गुरव हे मुंबईत वास्तव्यास आहेत.
स्वातंत्र्य सैनिक वसंतराव
माने हे कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत. त्यांनी
आपल्या 27 सहका-यांसोबत गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झाले. या महात्मा
गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. यामध्ये
पोर्तुगीज सैन्यांकडून आंदोलनकर्त्यांवर गोळया घातल्या गेल्या होत्या. मात्र, श्री
माने यांच्या नेतृत्वात असणा-या सत्याग्रहींनी जीवाची पर्वा न करता गोवा मुक्ती
संग्रामचे आंदोलन सुरू ठेवले. गोव्यातील
एका गावात या सत्याग्रहींनी राष्ट्र ध्वज फडकविला. याची माहिती जेव्हा पोर्तुगीज
सैनिकांना मिळाली. तेव्हा, त्यांनी श्री
माने सह त्यांच्या सहका-यांना बेदम मारहाण
करून गोव्याच्या सीमेबाहेर हाकलून लावले.
‘भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा
मुक्ती संग्राम’, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, यासोबतच
देशभरात झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा दरवर्षी 9 ऑगस्ट ‘क्रांती दिनी’ सन्मान केला जातो.
No comments:
Post a Comment