नवी दिल्ली दि. 08 : ‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा
मुक्ती आंदोलनात
मोलाचे
योगदान देणा-या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरूवारी क्रांती दिनी राष्ट्रपती भवन येथे
सन्मान होणार आहे.
क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो
आंदोलनाच्या 76 व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांचा
सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात येते.
गुरूवारी
सन्मान होणा-या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्हयातील कुपवडा
येथील श्री देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील श्री गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ. अवधूत डावरे आणि श्री वसंत अंबुरे,
मुंबईतील श्री गदाधर गाडगीळ आणि श्री अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील श्री बाळासाहेब जांभूळकर, श्री अरविंद मनोलकर, श्री
वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील श्री वसंतराव माने या स्वातंत्र्य
सैनिकांचा सन्मान होणार आहे.
No comments:
Post a Comment