नवी
दिल्ली, 1 : कोकण रेल्वेच्या 103 किलोमीटर
लांबीचा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली
असून या रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू
होणार असल्याची, माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज
दिली.
कोकण रेल्वेच्या कामासंबधी केंद्रीय मंत्री सुरेश
प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर श्री
प्रभु यांनी ही माहिती दिली. यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष, प्रकल्प संचालक, तसेच अन्य
वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी
बोलताना श्री प्रभू म्हणाले, 103 किलोमीटर लांबीच्या या नवीन रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. तसेच, महाराष्ट्राचा किना-यावरील क्षेत्राशी संपर्क
वाढणार. यामुळे याक्षेत्रात असणा-या बंदरांचा
जलदगतीने विकास होईल. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 50 टक्के खर्च रेल्वे मंत्रालय तर 50 टक्के खर्च महाराष्ट्र
शासन करणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑयल कॉर्पोरेशन,
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन
लिमिटेड तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी 40 अब्ज डॉलरचा निधी लागणे
अपेक्षित आहे. हा प्रकल्प 2022 पर्यंत बनुन
तयार होऊ शकतो या प्रकल्पातून दरवर्षी 60 लाख मेट्रिक टन तेल शुध्दीकरण होऊ शकते. यामुळे
अनेकांना रोजगार मिळणार आहेत. याकरिता या रेल्वे मार्गाचे विशेष महत्व आहे.
या रेल्वे मार्गावर नवीन 10 स्थानके बनणार
कोकणातील लहान शहरे तसेच गावांना
रेल्वेचा लाभ व्हावा यासाठी कोल्हापूर-वैभवाडी रेल्वे मार्गावर नवीन 10 छोटी स्थानके
बनविण्यात येईल. यामध्ये इंदापूर, गोरेगाव, सापेवामने, कल्बानी, कडवई, वारवली,
खारेपाटण, आचिरने, मिरजन, इनांजे या 10 रल्वे स्थानकांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या
स्थानकाचे उदघाटन जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती, श्री प्रभू
यांनी यावेळी दिली.
00000
No comments:
Post a Comment