Wednesday, 1 August 2018

महाराष्ट्रामध्ये 2 नवीन केंद्रीय विद्यालय



केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली, 1 :  महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणी जिल्ह्यात दोन नवीन केंद्रीय विद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली असून महाराष्ट्रातील 2 केंद्रीय विद्यालयांसह सहा राज्यात एकूण 13 केंद्रीय विद्यालयांना आज मंजूरी मिळाली. महाराष्ट्रातील होऊ घातलेले केंद्रीय विद्यालय विदर्भातील वाशीम आणि मराठवाडयातील परभणी जिल्ह्यात  असणार आहे. यासह मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयास मंजूरी मिळाली आहे.
देशभरातील 12 लाख विद्यार्थी केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेत आहेत.  13 नवीन शाळांमुळे 13 हजार  पेक्षा अधिक विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने  मार्च-2017 मध्ये  आव्हान प्रणालीच्या अंर्तगत अंदाजित 1160 कोटी रूपये मंजूर केले आहेत. याअंतर्गत 50 नवीन केंद्रीय विद्यालयांना स्थापन करण्याची मंजूरी दिली होती. हे विद्यालय त्याच ठिकाणी उघडण्यात येतील जेथे प्रायोजक संस्था केंद्रीय विद्यालयांच्या मानाकंनानुसार पात्र ठरतील. तसेच, प्रथम या, प्रथम घ्याया त्तवावर जमीन देतील. यासह अस्थायी भवनाची व्यवस्था करण्यासाठी पुढे येतील. यानुसार केंद्रीय विद्यालय संघटनाने प्रशासकीय आदेशान्वये आवश्यक नियम पूर्ण करीत असलेल्या  नवीन केंद्रीय विद्यालय उघडण्याचे प्रशासनिक आदेश जारी करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment