Monday, 20 August 2018

महाराष्ट्र सदनात सदभावना दिन साजरा














नवी दिल्ली, 20 :  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सदभावना दिन साजरा करण्यात आला.
दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात येते. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री सहाय यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनामी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन...अशी प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु सिंधु राजीव मलिक, विजय कायरकर, यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
                         महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिनाची प्रतिज्ञा
महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सदभावना दिनाची प्रतिज्ञा दिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे तसेच उपस्थित कर्मचा-यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. 

No comments:

Post a Comment