Friday, 3 August 2018

प्रा. चंद्रदेव कवडे यांची जागतिक हिंदी संमेलनासाठी निवड



नवी दिल्ली, 3 :  हैद्राबाद स्थित हिंदी प्रचार सभेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे सुपूत्र प्रा. चंद्रदेव कवडे यांची मॉरीशस येथील ११ व्या जागतिक  हिंदी संमेलनासाठी भारत सरकारच्या  शिष्टमंडळामध्ये  निवड झाली आहे.

            मॉरीशस मध्ये दिनांक  १८ ते २० ऑगष्ट २०१८ या कालावधी दरम्यान ११ वे जागतिक हिंदी संमेलन आयोजित करण्यात  आले आहे . या संमलेनासाठी भारतातून जाणा-या शासकीय शिष्टमंडळामध्ये प्रा. चंद्रदेव कवडे  यांची  निवड  करण्यात  आली. विदेश मंत्रालयाने त्यांची निवड केली आहे.

 मुळचे उस्मानाबाद जिल्हयातील वाशी येथील प्रा. कवडे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या हिंदी  विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेटची पदवी मिळविली असून ४० विद्यार्थ्यांनी एम.फील. केले आहे.

            प्रा. कवडे हे २००३ पासून हैद्राबाद स्थित हिंदी प्रचार सभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत.
                                                                000000
    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 291/  दिनांक  3.08.2018
           

                                   


No comments:

Post a Comment