Friday, 3 August 2018

निर्भया फंड अंतर्गत मुंबईसाठी २२५ कोटी











नवी दिल्ली, 3 :  देशातील प्रमुख आठ शहरांमधील महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, केंद्रशासनाने महत्वाचे पाऊले उचलत निर्भया फंड अंतर्गत २ हजार ९१९ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी वितरीत केला असून मुंबई शहरासाठी २२५ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
            केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.  ते म्हणाले, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाने महिलांसाठी सुरक्षित शहर बनविण्यासाठी देशातील प्रमुख आठ शहरांची निवड करण्यात आली. या शहरांमध्ये महिलांना अधिक  सुरक्षितता प्रदान करण्यासाठी  निर्भया फंड अंतर्गत  एकूण अंतर्गत २ हजार ९१९ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला.  मुंबई साठी २२५ कोटींचा निधी देण्यात आला असून मुंबईसह, दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, कोलकत्ता, बेंग्लुरू, हैद्राबाद आणि लखनऊ या शहरांची निवड करण्यात आली.
             निर्भया फंड अंतर्गत मुंबई शहरातील गुन्हे प्रवण भागात जीआयएस मॅपींग सेवा उभारण्यासाठी, सी.सी.टी.व्ही कॅमरे लावण्यासाठी, गुन्हे तपास अधिकारी व  विधी विभागाच्या अधिका-यांना प्रशिक्षण देण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. झोपडपट्टी  भागातील महिलांवरील शारीरिक अत्याचारांच्या गुन्हयांमध्ये पोलीस दिदि कार्यक्रमास सक्षम करण्यात येते. तसेच, माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यात येतो.  
                                                                000000
    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 292/  दिनांक  3.08.2018
   




No comments:

Post a Comment