नवी दिल्ली,
२१ : येत्या
4 सप्टेंबरला पुणे
जिल्हयातील
बारामती येथे नवीन
पासपोर्ट सेवा केंद्राला
सुरुवात होणार असल्याची
माहिती परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयाचे
सचिव डॉ. ज्ञानेश्वर
मुळे यांनी आज
महाराष्ट्र
परिचय केंद्रास दिली.
गेल्या दीड वर्षात
राज्यात १३ नवीन
पासपोर्ट सेवा केंद्र
सुरू झाल्याचेही त्यांनी
सांगितले.
देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने “पासपोर्ट आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात 289 पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून देशभरात आतापर्यंत २१६ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार असून आतापर्यंत १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर
४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
दीड वर्षात १३ पासपोर्ट सेवा केंद्र
राज्यात वर्ष 2014 पर्यंत 10 पासपोर्ट कार्यालये होती तर गेल्या दीड वर्षात 13 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आल्याचे
डॉ. मुळे म्हणाले. राज्यात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद,अहमदनगर,बीड,नांदेड, सांगली,
कोल्हापूर,सातारा,घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड या
शहरांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र
उभारण्यात आली असून या केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्य सुरु झाले आहे.
नव्याने
सुरु होणारी पास पोर्ट सेवा केंद्र
बारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार
असून यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ
सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल आणि सिंधुदुर्ग याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने
कामांस सुरुवात होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
0000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.316/दि.21-08-2018
No comments:
Post a Comment