Friday 24 August 2018

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १२ हजार २३८ घरे मंजूर




नवी दिल्ली, २४ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १२ हजार २३८ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण १ लाख १२ हजार २१३  घरे मंजूर करण्यात आली आहेत.  
        केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या गुरूवारी झालेल्या ३७ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध शहरांतील गरिबांसाठी १२ हजार २३८ घरे मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, हरियाणा,मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, अरूणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर या आठ राज्यांसाठी या बैठकीत एकूण १ लाख १२ हजार २१३ घरे मंजूर करण्यात आली आहेत.       
                 प्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता  ५४ लाख ९५ हजार ४४३ घरांना मंजुरी  दिले आहे.
       0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. ३२१/ दिनांक  २४.८.२०१८

No comments:

Post a Comment