Friday, 3 August 2018

आमदार हरिराम चेरो यांची महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट













               
                             ‘वारी’ विशेषांकाचे केले कौतुक
नवी दिल्ली, 2 : उत्तर प्रदेशातील  सोनभद्र जिल्हयातील दुध्‌दी विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिराम चेरो यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी  माहिती व जनसंपर्क          महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित ‘वारी’ विशेषांकाचे कौतुक केले.
             परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. चरो यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने  पंढरपूरच्या आषाढीवारीचे औचित्य साधून प्रकाशित केलेला हिंदी भाषेतील ‘वारी’ विशेषांक श्री. कांबळे यांनी श्री. चेरो यांना भेट स्वरूपात दिला. या अंकाची मांडणी  व यातील आशय आणि छायचित्रे अतिशय सुंदर असल्याच्या भावना यावेळी श्री. चेरो यांनी व्यक्त केल्या.
              श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याविषयी माहिती दिली. शासनाच्या जनसंपर्कासाठी कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला प्रभावी उपयोग , दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय याबाबतही माहिती दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. चेरो यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.            
                                                     ०००००   
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 289  दिनांक  2.०८.२०१८ 

No comments:

Post a Comment