नवी दिल्ली, 15 : भारत देशाचा 72 वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय
महाराष्ट्र सदनात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त (अतिरिक्त प्रभार)
समीर सहाय यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र
सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सादर करण्यात आलेले समूह राष्ट्रगीत आणि
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन विशेष आकर्षण
ठरले.
या
कार्यक्रमास महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, महाराष्ट्र सदनाच्या
सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधु, अजितसिंह नेगी तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह महाराष्ट्र सदन
व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र
सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे
अधिकारी-कर्मचारी, दिल्ली स्थित विविध क्षेत्रातील मराठी भाषिकही या कार्यक्रमास उपस्थित
होते.
राजधानीतील
लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी देशवाशियांना संबोधित केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त
राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
000000
रितेश भुयार /वृत्त वि.
क्र.308 / दिनांक 15.08.2018
No comments:
Post a Comment