नवी दिल्ली, 4 : सुक्ष्म, लघु,
मध्यम व्यवसायिकांना येणा-या समस्या सोडविण्यासाठी आज केंद्रीय वित्तराज्य मंत्री
शिव प्रताप शुक्ल यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली. असल्याची माहिती, केंद्रीय
वित्तमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 29 वी बैठक आज विज्ञान
भवनात आयोजित करण्यात आली. केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली
ही बैठक पार पाडली. यावेळी केंद्र वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल, विविध
राज्यांचे वित्त मंत्री, महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर
पाटील, जीएसटी परिषदेचे अधिकारी, राज्याचे विक्री कर आयुक्त राजीव जलोटा बैठकीस उपस्थित होते.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री शुक्ल यांच्या अध्यक्षतेत स्थापन समितीमध्ये
दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब राज्यांचे वित्त मंत्री सदस्य असणार आहेत. ही
समिती सुक्ष्म, लघु मध्यम व्यवसायिकांना वस्तु व सेवा कर मध्ये येणा-या अडचणींवर
अभ्यास करून उपाययोजना काढणार आहे.
याबरोबर वित्तीय विषय हे विधीशी
संबधित असतील ते विषय विधी मंत्रालयाकडे पाठवून त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी
माहितीही श्री गोयल यांनी दिली
युनिफाइड बिलिंग
इंटरफेस (युबीआय) मधून व्यवहार केल्यास 20 टक्के कॅशबॅक
आधार कार्डशी जोडलेल्या युनिफाइड बिलिंग इंटरफेस (युबीआय) ॲप मधून
पैश्यांची देवाण-घेवाण केल्यास 20 टक्के
कॅशबॅक मिळणार असल्याची माहिती, केंद्रीय वित्तमंत्री यांनी यावेळी दिली. यामुळे
भीम, रूपे कार्ड या ॲपचा वापर अधिक प्रमाणात होईल. यामुळे डिजीटल व्यवहार अधिकाधिक होतील आणि ग्राहकांनाही याचा
लाभ घेता येईल.
महाराष्ट्रातील उद्योकजांच्या समस्या जीएसटी परिषदेसमोर ठेवल्या
: संभाजी निलंगेकर-पाटील
महाराष्ट्रातील सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योजकांना वस्तू व सेवा कर लागू
झाल्यापासून येणा-या समस्या जीएसटी परिषदेसमोर ठेवल्या. अशी माहिती कौशल्य विकास
मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी आज दिली.
राज्यातील महाराष्ट्र चेम्बर ऑफ
कॉमर्स, मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, सीआयआय, तसेच अन्य जवळपास 30 उद्योजक संस्थांकडून
जे सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योगात कार्यरत आहेत. अशा व्यवसायिकांना येणा-या समस्यांचे
निवेदन केंद्र शासनाकडे मांडण्यात आले. असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शेवटच्या उद्योजकांना
वस्तू सेवा कर लागू झाल्यापासून येणा-या अडचणी सोडविण्याचा राज्यशासनाचा ध्यास आहे.
ग्रामीण उद्योजकांनी डिजीटल सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा याविषयावरही आज चर्चा झाली
असल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment