नवी
दिल्ली, ८ : देशाच्या राजधानीत मराठी भाषा व संस्कृती जपण्यात
महाराष्ट्र परिचय केंद्र मोलाचे कार्य करीत असल्याचे गौरवोद्गाार लातूरचे खासदार
डॉ. सुनील गायकवाड यांनी आज काढले.
डॉ. गायकवाड यांनी आज परिचय केंद्रास भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा,
माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार आणि दैनिक सामनाचे दिल्ली
ब्युरोचीफ निलेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
राजधानीत मराठी भाषा व संस्कृती
जोपासण्यासाठी परिचय केंद्राच्याच्यावतीने
राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद
असल्याचे डॉ. गायकवाड यावेळी म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या योजना व उपक्रमांची
माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यालयाच्या सामाजिक माध्यमांच्या प्रभावी
वापराबाबतही त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेदरम्यान
श्री. कांबळे यांनी परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याविषयी माहिती दिली. मुळात
पत्रकारिता व जनसंपर्क हा आवडीचा विषय असलेले डॉ. गायकवाड यांनी कार्यालयाच्यावतीने
आयोजित ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे
खास कौतुक केले.
डॉ.
गायकवाड यांनी दिली पुस्तके भेट
डॉ. गायकवाड यांनी लिहीलेले ‘जनसंवाद’
, ‘मरीन फुड प्रोडक्टस इन इंडिया’ पुस्तके आणि ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अ
युनीक थिंकर ऑफ ट्वेटीथ सेंच्युरी’ हे पुस्तक
त्यांनी परिचय केंद्राच्या ग्रंथालयास भेट दिले. डॉ. गायकवाड उत्तम लेखक व
कवी आहेत. त्यांनी यावेळी विविध सामाजिक विषयांवरील कविता व चारोळी सादर केल्या.
दिल्लीस्थित विविध
राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील
सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्री. कांबळे
यांनी माहिती दिली. दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध
प्रकाशने आदींची माहिती श्री. कांबळे यांनी यावेळी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय
तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन डॉ. गायकवाड यांनी माहिती जाणून घेतली व
कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र. २९८/ दिनांक
०८.०८.२०१८
No comments:
Post a Comment