Thursday 27 September 2018

स्टार्टअप इडिंया - महाराष्ट्र यात्रेचा 3 ऑक्टोबर रोजी शुभारंभ




उपक्रमादरम्यान 10 जिल्ह्यात शिबीर तर 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार

नवी दिल्ली, 27 : नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ 3 ऑक्टोबर रोजी  राजभवन, मुंबई येथून  होणार आहे. यातंर्गत 10 जिल्ह्यांमध्ये शिबीर आयोजित करण्यात येतील तर 23 शहरांमध्ये  स्टार्टअप व्हॅन थांबणार आहे.
            महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु आणि महाराष्ट्राचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ  होणार आहे.
स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने देशातील छोटया जिल्ह्यांमधील नवउद्योजक प्रतिभेला शोधने हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्रात भविष्य करू इच्छिणा-यांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा प्रदान करून देणेही या यात्रे मागचा मानस आहे.
नाविण्यपूर्ण कल्पना घेऊन येणा-या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी युक्त सुसज्ज व्हॅन स्टार्टअप इंडिया यात्रेत असणार आहे.  ही व्हॅन 16 जिल्ह्यांतून 23 शहरांमधून जाणार असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपूर येथे भव्य समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान 10 ठिकाणी शिबीर आयोजित केले जातील, जिथे स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्टअप धोरण यावर सादरीकरण केले जाईल.
या यात्रेत सहभागी होण्यासाठी www.startupindia.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
10 जिल्ह्यांमध्ये शिबीर आयोजित
मराठवाडा विभागात औरंगाबाद, बीड आणि हिंगोली येथे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर येथे विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला तर कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
यात्रे दरम्यान 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार
स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रे दरम्यान राज्यातील 23 शहरांमध्ये स्टार्टअप  व्हॅन थांबणार आहे. यामध्ये पालघर, कल्याण, वेंर्गुला, मालवण, राजापूर, कुडाळ, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, शिर्डी, मालेगाव, धुळे, जळगाव, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ही शहरे आहेत.

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप  यात्रे दरम्यान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत .

अ.क्र.
दिनांक
शहर
1.
15 ऑक्टोंबर 2018
औरंगाबाद
2.
16 ऑक्टोंबर 2018
बिड
3.
18 ऑक्टोंबर 2018
सोलापूर
4.
20 ऑक्टोंबर 2018
सिंधूदूर्ग
5.
22 ऑक्टोंबर 2018
रत्नागिरी
6.
24 ऑक्टोंबर 2018
पुणे
7.
26 ऑक्टोंबर 2018
हिंगोली
8.
27 ऑक्टोंबर 2018
अकोला
9.
29 ऑक्टोंबर 2018
चंद्रपूर
10.
31 ऑक्टोंबर 2018
नागपूर

23 ठिकाणी स्टार्टअप यात्रेची व्हॅन थांबणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

अ.क्र.
दिनांक
शहर
1.
04 ऑक्टोंबर 2018
पालघर
2.
04 ऑक्टोंबर 2018
कल्याण
3.
06 ऑक्टोंबर 2018
वेंर्गुला
4.
06 ऑक्टोंबर 2018
मालवण
5.
08 ऑक्टोंबर 2018
राजापूर
6.
08 ऑक्टोंबर 2018
कुडाळ
7.
09 ऑक्टोंबर 2018
कोल्हापूर
8.
09 ऑक्टोंबर 2018
सांगली
9.
10 ऑक्टोंबर 2018
पुणे
10.
11 ऑक्टोंबर 2018
अहमदनगर
11.
12 ऑक्टोंबर 2018
औरंगाबाद
12.
12 ऑक्टोंबर 2018
शिर्डी
13.
13 ऑक्टोंबर 2018
मालेगाव
14.
13 ऑक्टोंबर 2018
धुळे
15.
15 ऑक्टोंबर 2018
जळगाव
16.
16 ऑक्टोंबर 2018
बीड
17.
17 ऑक्टोंबर 2018
नांदेड
18.
19 ऑक्टोंबर 2018
यवतमाळ
19.
19 ऑक्टोंबर 2018
अमरावती
20.
20 ऑक्टोंबर 2018
भंडारा
21.
22 ऑक्टोंबर 2018
चंद्रपूर
22.
22 ऑक्टोंबर 2018
गडचिरोली
23.
23 ऑक्टोंबर 2018
नागपूर


           

No comments:

Post a Comment