सामाजिक एकोपा जपन्याचे केले आवाहन
नवी दिल्ली , १४ : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता
मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी महाराष्ट्र सदनात गणरायाचे दर्शन घेतले व आरती
केली.
सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात गुरुवारी गणरायाची
प्रतिष्ठापना झाली . गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गणरायाचे दर्शन घेतले . त्यांनी गणरायाची पूजा व आरती केली. सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, गणेशभक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री आठवले यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सत्तेविरोधात समाज संघटन करण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाची सुरुवात केली. 'सामाजिक एकता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभर सामाजिक एकोपा निर्माण व्हावा' असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव आयोजनाच्या माध्यमातून दिल्लीतील मराठी, अमराठी गणेशभक्त एकत्र येऊन हा उत्सव गुण्या गोविंदाने साजरा करतात. या माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडते व महाराष्ट्राची पंरपराही जपली जाते. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील सर्व मराठी गणेशोत्सव मंडळांसह सर्व दिल्लीकरांना त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
0000
रितेश भुयार,/ वृत्त वि. क्र.३४४/ दिनांक १४.०९.२०१८
No comments:
Post a Comment