नवी दिल्ली, 12 : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून
राज्याला 60.76 कोटी रूपयांचा निधी आज
मंजूर करण्यात आला.
केंद्रीय
गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत आज उच्च अधिकार प्राप्त समितीची बैठक
झाली. या बैठकीत उत्तर प्रदेशला 157.23 आणि महाराष्ट्राला 60.76 कोटी रूपयांचा
अतिरीक्त निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्राला हा निधी वर्ष 2017 मध्ये किटक हल्ल्याने प्रभावित झालेल्यांसाठी तसेच चक्रीवादळात
झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी प्रदान करण्यात आलेला आहे.
आज झालेल्या बैठकीत केंद्रीय कृषी व शेतकरी
कल्याण मंत्री राधा मोहन सिंग, केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली, केंद्रीय गृह
सचिव राजीव गौबा तसेच विविध मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment