Friday, 14 September 2018

महाराष्ट्र बँकेला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’





नवी दिल्ली , १४ : महाराष्ट्र बँकेला हिंदी भाषेत बँकेचे कामकाज उत्कृष्टपणे केल्याबद्दल व्दितीय क्रमांकाचा राजभाषा कीर्ती पुरस्कारा ने  आज सन्मानित करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने हिंदी दिवसकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रीजीजु, हंस राज अहीर  उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील शासकीय व खाजगी संस्थांना तसेच व्यक्तीगतरीत्या हिंदी भाषेला समृद्ध करणा-या तज्ञांचा गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.
 महाराष्ट्र बँक दैंनदिन  कामकाजाचे कार्यान्वय हिंदी मध्ये करीत असल्यामुळे राजभाषा कीर्ती  या  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  महाराष्ट्र बँकेला मिळालेला पुरस्कार बँकेचे कार्यकारी अधिकारी अलेख राऊत यांनी स्वीकारला.
याप्रसंगी हिंदीचे महत्व व्यक्त करीत सामाजिक माध्यमांव्दारे यासह इतर क्षेत्रातही हिंदीचा होत असलेला अधिक वापरावर प्रकाश टाकण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने हिंदीमध्ये सुरू केलेले व्टिटर हँडल, फेसबुक यावरून हे लक्षात येते की हिंदी भाषकांची जगभर कोटयावधी लोकसंख्या आहे. हिंदी भाषेत मोठया प्रमाणात संदर्भ माहिती निर्मिती होत असल्याचेही माहिती केंद्रीय गृह मंत्री श्री सिंग यांनी दिली.

No comments:

Post a Comment