Tuesday, 2 October 2018

राजधानीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी






      
नवी दिल्ली, 02 :  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  
            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधु, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  

         महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना अभिवादन करण्यात आले. कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
       0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 360/ दिनांक  02.10.2018


No comments:

Post a Comment