नवी दिल्ली, २६ : महाराष्ट्र सदन , महाराष्ट्र परिचय केंद्र आणि
केंद्रीय अल्पसंख्याक आयोग येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला.
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’
सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त(अ.का.)समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन
चंद्रा, इशु संधू, विजय कायरकर, राजीव मलिक, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात ‘संविधान दिन’
साजरा
महाराष्ट्र
परिचय केंद्रात ‘संविधान दिन’
साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचा-यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन केले. यावेळी
उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र
परिचय केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत उपस्थित होते.
केंद्रीय
अल्पसंख्याक आयोगात ‘संविधान दिन’ साजरा
केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या
कार्यालयात आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष सैयद गयरुल हसन रिजवी, सदस्य सुलेखाताई कुंभारे, प्रसिध्द अभिनेत्री
सलमा आगा यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचारी
यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’
सामुहिकपणे वाचन केले. यावेळी आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व उपस्थित अधिकारी -कर्मचारी
यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०६/ दिनांक
26.11.2018
No comments:
Post a Comment