नवी
दिल्ली दि. 26 : पुणे
विमानतळ, अहमदनगर बायपास व नागपूर शहरातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील
प्रस्तावीत विकास प्रकल्पांबाबत आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन
गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांच्या उपस्थित
महत्वाची बैठक झाली.
श्री.गडकरी
यांच्या २ मोतीलाल नेहरू प्लेस या निवासस्थानी
आज महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकास कामांविषयी महत्वपूर्ण
बैठक झाली. यावेळी बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालक
मंत्री गिरीष बापट, ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी
यावेळी उपस्थित होते .
याबैठकीत
पुणे, अहमदनगर आणि नागपूर येथील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकासकार्याबाबत
चर्चा झाली. पुणे विमानतळासाठी 15.84 एकर
जागा हस्तांतरीत करणे व विमानतळासंदर्भात इतर मंजुरी देणे, पुणे येथील चांदणी चौक
आणि एनडीए –पाषण रस्त्याच्या कामाला परवानगी देणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली. अहमदनगर
बायपास आणि उड्डानपुलास परवानगी देण्यासंदर्भातही चर्चा झाली.
नागपूरच्या
गणेश मंदिरासाठी जागा हस्तांतरीत करणे, शहरातील संरक्षणमंत्रालयाची जागा महानगर
पालिकेला सौंदर्यीकरण, शैक्षणिक कार्य आणि अन्य विकास कामांसाठी हस्तांतरीत
करण्याबाबत चर्चा झाली. तसेच नागपुरातील झिरोमाईल्सचा विकास करण्याबाबतही चर्चा झाली.
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र. 430/ दिनांक
२६.१२.२०१८
No comments:
Post a Comment