Tuesday, 29 January 2019

महाराष्ट्राला दुष्काळानिवारणासाठी 4 हजार 714 कोटींची मदत







नवी दिल्ली, 29 : केंद्रशासनाने आज महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 714कोटी 28 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
            केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत आज ही मंजुरी देण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्रासह देशातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेले 6 राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेश यांच्यासाठी एकूण 7 हजार 214 कोटी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली .
                               मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला केंद्राकडे पाठपुरावा

मागील वर्षी महाराष्ट्रात आलेल्या गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी राज्याने केंद्र शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव यांची भेट घेवून राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी राज्याने सादर केलेला मदतनिधी प्रस्ताव लवकर मंजूर करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आज राज्याला  4 हजार 714कोटी 28 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह गृहमंत्रालय, अर्थमंत्रालय, कृषीमंत्रालय व निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                          00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.44/दि.29.01.2019



No comments:

Post a Comment