Thursday, 24 January 2019

ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परिचय केंद्राला भेट






नवी दिल्ली, २ : ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली.   
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या  सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजच्या जनसंवाद विभागाच्या 53 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी विभाग प्रमुख तथा अभ्यास दौ-याचे समन्वयक प्राध्यापक जितेंद्र हळदणकर यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
        यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची विस्तृत  माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
            महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून शासनाची प्रभावीपणे करण्यात येणारी प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.                        
उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याविषयीचे सादरीकरण केले. तर ज्ञानसाधना कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे सहयोगी प्राध्यापक संतोष पठारे यांनी आभार मानले.
                                                                 0000
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                          00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.32/दि.24.01.2019







No comments:

Post a Comment