नवी दिल्ली, 12 : नवीकरणीय ऊर्जेच्या
विविध स्त्रोतांद्वारे डिसेंबर 2018 पर्यंत देशभरात 74.79 गीगा वॅट वीज निर्मिती क्षमता
स्थापित करण्यात आली असून महाराष्ट्रात 9 हजार 300. 18 मेगा वॅट वीज निर्मीती क्षमता
स्थापित करण्यात आली आहे..
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय
ऊर्जा मंत्रालयाने वर्ष 2018-19 (5 फेब्रुवारी 2019) पर्यंत राज्यांना नवीकरणीय ऊर्जा
स्त्रोतांद्वारे वीज निर्मिती स्थापित करण्यासाठी केंद्रीय सहायता निधीतून 3 हजार
584 कोटी 8 लाखांचा निधी प्रदान केला. या माध्यमातून देशात डिसेंबर 2018 पर्यंत सौर
ऊर्जेच्या माध्यमातून 25.21 गीगा वॅट , पवन ऊर्जेच्या माध्यमातून 35.14 गीगा वॅट, जैविक
ऊर्जेद्वारे 9.92 गीगा वॅट आणि लघु जल ऊर्जेद्वारे
4.52 गीगा वॅट अशा एकूण 74.79 वीज निर्मिती
क्षमता स्थापित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 9 हजार 300. 18 मेगा
वॅट वीज निर्मीती क्षमता
महाराष्ट्रात डिसेंबर 2018 पर्यंत सौर ऊर्जेच्या
माध्यमातून 1607.79 मेगा वॅट , पवन ऊर्जेच्या माध्यमातून 4788.13 मेगा वॅट, जैविक ऊर्जेद्वारे
2528.69 मेगा वॅट आणि लघु जल ऊर्जेद्वारे 375.570 मेगा वॅट अशा एकूण 9 हजार 300. 18 मेगा वॅट वीज निर्मीती क्षमता स्थापित
झाली आहे.
केंद्रीय नवीन व नवीकरणीय
ऊर्जा तथा ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)आर.के.सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी
प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.64/दि.12.02.2019
No comments:
Post a Comment