नवी
दिल्ली, 12 : परराष्ट्र विभाग हा केवळ विदेशातील राष्ट्रांशी संबंधीतच
काम करीत असल्याचा समज मोडून काढत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा संबंध हा सामान्य
भारतीयांशी जोडण्याचा व तो दृढ करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मनोगत परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयाचे निवृत्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र सदनातील सभागृहात ‘पुढचे पाऊल’ च्यावतीने ज्ञानेश्वर मुळे यांच्या
निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्र शासनाच्या विविध
विभागातील मराठी अधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ज्ञानेश्वर मुळे यांचा
चाहता वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
श्री मुळे म्हणाले, पारपत्र काढणे हे एक जिकरीचे व महाकठीण काम असण्याचा समज
लोकांमध्ये होता तो समज मोडुन पारपत्र लोकांच्या दारी पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
हे काम महाराष्ट्राच्या मुशीत घडलेले बालपण, सामजिक विचार, संस्कार यामुळेच शक्य
होऊ शकले, अशी प्रांजळपणे कबुलीही त्यांनी
यावेळी केली.
लोकांनी भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल श्री मुळे यांनी आभार व्यक्त केले. तसेच,
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील विविध विभागात काम करित असताना आलेले चांगले अनुभव
त्यांनी याप्रसंगी सर्वांसमोर मांडले. यापुढील आयुष्यात ‘चांगुलपणाची चळवळ’ सुरू ठेवून देशाच्या प्रशासनाला
अधिक मजबुत करण्याचा प्रयत्न करेल, असे अभिवचन श्री मुळे यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी श्री विलास बुरडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत श्री मुळे यांची व्यक्तीगत,
साहित्यिक आणि प्रशासकीय कारर्किदी विषयीची संपुर्ण माहिती दिली. कार्यक्रमात श्रीमती
साधना शंकर (मुळे), वाईस एडमिरल सतीश घोरमाडे, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, अभय
भावे, सत्यजित वैद्य, अर्चना मिरजकर, मधुरा फाटक, औदुबंर चव्हाण, कर्नल कात्तीकर, उत्तम
गायकवाड, योगेश केदार, प्रफुल्ल पाठक
यांनी त्यांच्या श्री मुळे यांच्याशी झालेला परिचय, त्यांनी केलेली मदत, अनुभव
त्यांच्या स्वभावातील विविध कंगोरे याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment