नवी दिल्ली दि. 19 : टाळ-मृदंग, ढोल-
ताशे, हलगी, लेझीम, हत्ती- घोडे- उंट, नऊवारीसाडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील
स्त्रिया, मावळे व त्यांच्या मुखातील ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गर्जनेने राजधानी दिल्लीचा
आसमंत दुमदुमून गेला. प्रसंग, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा
जयंती सोहळा.
कस्तुरबा गांधी
मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. सदनाच्या
सभागृहात खासदार संभाजी छत्रपती यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात
सहभाग घेऊन पाळणा केला. यानंतर संभाजी छत्रपती यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.
महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात. खासदार संभाजी छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाचे निवासी
आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधू, अजितसिंह नेगी , महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली परिसरातील उपस्थित
मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
शोभा यात्रा ठरली आकर्षण
महाराष्ट्र सदनातून
यावेळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत हत्तीवर आसनस्थ असलेले
छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आकर्षण ठरत होते. महाराजांच्या हत्तीवरील स्वारी
समोर घोडयावर स्वार मावळे आणि सांप्रदायिक भजन मंडळीचा सहभाग शोभून दिसत होता.
ज्ञानोबा –तुकाराम या गजराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातारवण
निणादून गेले होते. ढोल-ताशे व झांज पथकात सहभागी झालेल्या मुली व तरूण मुले यांचा
उत्साह शोभून दिसत होता. याच शोभा यात्रेत
दोरखंडावर विविध आसणं सादर करणा-या नऊवारीतील
मुली आणि मल्लखांबाचे सादरीकरण करणारे मुले, मर्दाणी खेळांचे प्रात्यक्षिक सादर
करणा-या तरूणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थीही मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.
खास मराठी पेहरावातील या विद्यार्थ्यांनी लेझीम वर सर्वांना ठेका धरायला लावला.
महाराष्ट्र सदनापासून निघालेल्या शोभा यात्रेचा समारोप येथील इंदिरा गांधी
राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर झाला.
महाराष्ट्र
सदनात संत रविदास जयंती साजरी
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आज संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात
आली. निवासी आयुक्त समीर सहाय यांनी संत रविदास यांच्या प्रतिमेस पुष्हार अर्पण
करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधू,अजितसिंह नेगी,
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र
सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण
करून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment