नवी दिल्ली, 15 : वसई-विरार महानगर पालिकेचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी वसई-विरार महानगर पालिकेच्या आकांक्षा शहर स्तर संघाने देशात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला .तर राज्यातून याच महानगर पालिकेच्या सक्षम आणि युगंधरा वस्ती स्तर संघाने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकाविला आहे. यापार्श्वभूमीवर परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आज पालिकेचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे
यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला .यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.
श्री.
हेरवाडे यांनी यावेळी, महानगर पालिकेद्वारे
राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण उपक्रमांबाबत माहितीही त्यांनी जाणून घेतली. शासनातील जनसंपर्क विषयावरील
राष्ट्रीय कार्यशाळा, राज्य शासनाच्या विविध
उपक्रमांबाबत समाज माध्यमांद्वारे करण्यात येणारी प्रभावी प्रसिध्दी आणि
कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त
केले.
दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण-घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्री. कांबळे यांनी माहिती दिली.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.71/दि.15.02.2019
No comments:
Post a Comment