Monday, 4 February 2019

संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सेवांचा निकाल जाहीर











                 महाराष्ट्रातील 17 पुरुष व 3 महिलांचा समावेश

नवी दिल्ली, 4 : संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता घेण्यात आलेल्या ल्या एकत्रित परिक्षांचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातील 172 उमेदवरांची निवड झाली असून महाराष्ट्रातील 17 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवारांचा यात समावेश आहे.
            संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेंवांकरिता उमेदवारांच्या निवडीसाठी  केंद्रीय लोकसेवा आयोगाने  2018 मध्ये लेखी परिक्षा घेतली होती.  लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती  संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतल्या असून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.   देशातील 130 पुरुष व 42  महिला अशा एकूण 172 उमेदवारांची निवड करण्यात आली असून  महाराष्ट्रातील 17 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवारांचा यात समावेश आहे.

                         गुणांकन यादी नुसार महाराष्ट्रातील निवड झालेल्या पुरुष उमेदवारांची नावे

        देशातील 130 पुरुष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण 17 उमेदवारांचा समावेश आहे. मयुर मनोहर हिवळे(9), योगेश शिवाजी वानवे (18), सिध्देश कावळकर (22), विनोद राजेंद्र शिंदे (51), ओंकार दिगंबर उधान (57), अक्षय बब्रुवाहन टाळके (61),अनिवेश अरविंद होळे (64), मयुर राजेश तलवाले (81), अभिजीत दत्तात्रय ताम्हणकर (90), रिषभ भारत भालेराव (96), कैवल्य सतिश कुळकर्णी (98), हर्षवर्धन अनिल चव्हाण (109), उदित हेमंत देसाई (110), संकेत भरत जाधव (115), भरत शंकर गंटी (117), अभिनव प्रधान (119), श्रेयस बब्रुवाहन पाटील (130).              

                               गुणांकन यादी नुसार  निवड झालेल्या महिला उमेदवारांची नावे

                    देशातील 42 महिला उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण तीन उमेदवारांचा समावेश आहे. प्रिती पवार (5) राधिका सतिश तळेकर (7) अन्वेशा प्रधान(25).

                               निवड झालेल्या उमेदवरांचे एप्रिल 2019 पासून प्रशिक्षण

             निवड झालेले पुरुष उमेदवार संरक्षण मंत्रालयाच्या  चेन्नई स्थित अधिकारी प्रशिक्षण  संस्थेच्या 109 व्या शॉर्ट सर्विस कमिशन कोर्स मध्ये सहभागी होतील तर महिला उमेदवार याच संस्थेच्या 23 व्या शॉर्ट सर्विस कमिशन कोर्स मध्ये सहभाग घेतील. हा प्रशिक्षण कार्यक्रम एप्रिल 2019 पासून सुरु होणार आहे.      
              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                        00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.54/दि.4.02.2019


No comments:

Post a Comment