Thursday, 7 March 2019

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ ला केंद्रीय कॅबीनेटची मंजुरी







नवी दिल्ली,  :  मुंबई उपनगरी रेल्वेवरील तान कमी करणारा व वाहतुकीसाठी वरदान ठरणा-या ‘मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा 3-अ’ ला आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 30 हजार 849 कोटींचा खर्च अपेक्षित असून येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने आज ही मंजुरी दिली आहे.  मुंबई उपनगरी रेल्वेवरील वाढती वाहतूक व प्रवाशांची गर्दी पाहता हा ताण कमी करण्याकरिता तसेच प्रवशांच्या सुरक्षेकरिता ‘मुंबई शहरी प्रकल्प टप्पा-३’ तयार करण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वेला वाताणूकुलीत डबे जोडण्यात येणार असून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजीघेत रेल्वेला स्वचलीत दारवाजे बसविण्यात येणार आहेत. लांब अंतराचा प्रवास करणा-या उपनरीय प्रवशांच्या सोयीसाठी कॉरीडॉर उभारण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी होणारी गर्दी दूर करण्यासह प्रवाशांची सुरक्षा व स्थानकावर आवश्यक सुविधाही या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वेची सुरक्षितता, क्षमतावृध्दी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी दळणवळणावर  आधारीत रेल्वे नियंत्रण प्रणालीची नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या परिचलनापासून उपनगरीय रेल्वेच्या परिचलन स्वतंत्र ठेवण्याच्यादृष्टीनेही या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईचा प्राण असून दररोज ३ हजारांहून अधिक रेल्वे गाडयांमधून ८ दशलक्ष प्रवाशी प्रवास करतात. क्षमतेपेक्षा चौपट प्रवाशी ताण या रेल्वेमार्गावर होत असतो. मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील ३८५ कि.मी. वर मुंबई उपनगरीय रेल्वेचे  जाळे आहे. मुंबईतील मध्य रेल्वे  मार्गावर  दोन , पश्चिम रेल्वेमार्गावर दोन आणि हार्बर मार्गावर एक असे एकूण पाच कॉरीडॉर आहेत.

हे सर्व चित्र पाहता प्रवशांना उत्तम सुविधा व सुरक्षा पोहचविण्यासाठी ‘मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ’ महत्वपूर्ण ठरणार असून  मुंबई उपनगरीय वाहतूक सेवा मजबूत होणार आहे.
                                     
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                       
                                           0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 91 / दिनांक  07.03.2019





No comments:

Post a Comment